२२ सप्टें, २०२१

आयुष्य सारं काळया आईसाठी ...

राब - राबते मी शेतात ,
आनंदाने न्हाहते कष्टाच्या घामात ,

तन - मन - धन काळया आई त गुंतवते ,
रक्ताच पाणी तिच्याच कुशीत आटवते ,

फुललेल्या शिवाराचे स्वप्न नयनी साठवते ,
धरणी मायेच्या पोटी जन्मलेल्या रोपाला गोंजारते ,
यशोदा होऊन कान्हासारख लाडविते ,

रोपाच्या संवरधनासाठी दीन - रात झटते ,
वट वृक्षात रूपांतर होण्यासाठी काबाड कष्ट करते ,
आयुष्य माझं सारं माय भुमिसाठी अर्पिते ,

दसऱ्याला काळया आईची मनोभावे पूजा करते ,
सोन्यासारखं पिकं फुलू दे मागणं मागते ,
तुझ्यासाठी तुझ्या लेकरांसाठी अती करते ,
आयुष्यभर तुझ्यासाठी ग जगते ,

माझ्या कष्टाचे चीज होऊ दे ग बाई ,
चुकलं असेल काही तर , माफ कर ग आई 

९ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे अतिशयोक्ती कुठे दिसत नाही वर्णन केल तस चित्र उभे राहिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान रचना....तिच्या मुळेच जीवन जगायचे तीच्याताच मिसळून जायचे...👍👌✍️🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम अप्रतिमच... लिहिलंय खूपच सुंदर👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. WOW...!!
    खूपच छान अप्रतिम भाव व्यक्त केले..!👌
    खूप खूप शुभेच्छा ‌.🌹
    👌👌👌👌👌👌👌👌
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

Comments:
आपल्या समीक्षा येथे लिहा.

स्वप्न

 स्वप्न माझे तुझे  एक व्हावे