
image source google/image by ....
घर फक्त चार भिंतीच् नसतं ,
तर त्यात राहणाऱ्या बोलक्या माणसाचं असतं ,
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेली असते माणसांची कहाणी ,
भिंती भिंतीवर असते आठवणीं ची निशाणी ,
घर चार ताळाच् असो , किंवा चार भिंतीच् ,
खर घर तर असतं ते माणसांच्या जिव्हाळ्याच ,
घर छोट असो किंवा मोठं ,
त्यात नेहमी असावे हसणारे ओठ ,
घर सामनांनी जरी असेल रिते ,
तरी त्यात हवे प्रेमाचे नाते ,
घरावर चालतील गळके पत्र ,
मात्र भक्कम असावे वात्सलेचे छत्र ,
घरात जरी मनमोकळी नसेल जागा ,
तरी आयुष्यभराचा संस्कार असतो प्रेमाने वागा ,
घरात जरी असेल मातीचा गोबा ,
दुडू दुडु धावणाऱ्या पावलांनी त्यालाही येते शोभा ,
घर फक्त घर नसते ,
ते तर अतूट नात्यांची वीण असते .
२२ सप्टें, २०२१
घर फक्त घर नसते ..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
स्वप्न
स्वप्न माझे तुझे एक व्हावे
-
राब - राबते मी शेतात , आनंदाने न्हाहते कष्टाच्या घामात , तन - मन - धन काळया आई त गुंतवते , रक्ताच पाणी तिच्याच कुशीत आटवते , फुल...
👌👌👌👌अतिशय सुंदर रचना घराविषयी केली नित्या, अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाखूपच छान सुंदरच ...👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏