अनोळखी तो अल्लड वारा ,
मनास छेडून गेला ,
विरलेल्या आठवणी ताज्या करून गेला
झुळूक होऊन आला तो अनोळखी पाहुणा ,
ओळखीचा का भासत होता काही कळेना ,
सहवास लाभता त्यांचा डोळ्यातील पाणी काही थांबेना ,
पूर खळखळ वाहू लागला ,
पावण्याचे स्वागतच करायला विसरून गेला ,
मन मोर आठवणींच्या हिंदोळ्यावर डोलू लागला ,
आठवणींचा पूर तो वाहणारच ,
अनोळखी पाहुणा तो ओळखीचा वाटणारच ,
ठाव मनाचा तो घेणारच ,
क्षण हा हळवा करून जाणारच ,
कोवळ्या मनाला यातना ह्या होणारच ,
आठवणींचा पूर तो नयनी दाटून येणारच.......
खूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर..👌👌🌺❤️🌹💗💗🌿🌿
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर शब्द आहेत
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌
उत्तर द्याहटवाSundar shabda rachna....👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवा