२३ सप्टें, २०२१

हरवलेले ते शब्द

हरवलेले ते शब्द ,  
मी शोधत असताना ,
गवसले ते तुझ्या , 
काकणात किणकिण ताना ,

तुझी माझी प्रीत ही ,
जशी बांगड्यांची किणकिण ,
शब्द ते जणू पावसाची रिपझिम ,

हरवले ते शब्द ,
भावंनाही झाल्या स्तब्ध ,
असं कसं चालायचं ,
एकमेकांशिवाय कसं जगायचं ,

हरवलेले शब्द माझे ,
गवसले मी तुझ्या काकणात ,
ते शब्द थेट पोहोचले तुझ्या हृदयात ,
स्वर प्रितीचे पुन्हा गुंजु लागले कानात ...

२२ सप्टें, २०२१

आस ही सरली

आस ही सरली ,
प्रीत ही विरली ,
तू हाक न ऐकली ,
प्रेमाची ....

अबोल नंयनांची ,
भाषा निशब्द झाली ,
अश्रू होऊन ओघळली ,
प्रीत ही रडली ....

पाठ फिरवली ,
स्वप्न आयुष्याची ,
विखरली ,
प्रेम वेल ही करपली ,

प्रीतीला ह्या ,
नजर कुणाची लागली ,
कलेनाशी झाली ,

मिलन दोन जीवांचे ,
अतूट झालेले ,
क्षणात विखुरले ,

स्वप्न नव्याने पहावे ,
एक होण्याचे ,
पुन्हा प्रेमात पडण्याचे ,
कळेनासे झाले ,

कल्पनेने ह्या ,
डोळे पाणावले ,
अश्रू हे गिळले ,
श्वास हे थांबले ,
एकमेकांत गुंतले ...

स्वप्न नवे सत्य हवे

हे स्वप्न नवे ,
सत्य हवे ,
तुझ्यासवे ,

प्रितीचे स्वर हे ,
भास नको ,
श्वास हवे ,

मेघाच्या त्या ,
किनाऱ्यावर ,
नाव माझे ,
तुझ्यासवे हवे ,

स्पंदने ही मुके ,
नको आभासी धुके ,
जी की प्रीत रोके ,

सत्यात उतरावे ,
ते आभास सारे ,
प्रितीचे उनाड वारे ,

घर फक्त घर नसते ..


image source google/image by ....
घर फक्त चार भिंतीच् नसतं ,
तर त्यात राहणाऱ्या बोलक्या माणसाचं असतं ,
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेली असते माणसांची कहाणी ,
भिंती भिंतीवर असते आठवणीं ची निशाणी ,
घर चार ताळाच् असो , किंवा चार भिंतीच् ,
खर घर तर असतं ते माणसांच्या जिव्हाळ्याच ,
घर छोट असो किंवा मोठं ,
त्यात नेहमी असावे हसणारे ओठ ,
घर सामनांनी जरी असेल रिते ,
तरी त्यात हवे प्रेमाचे नाते ,
घरावर चालतील गळके पत्र ,
मात्र भक्कम असावे वात्सलेचे  छत्र ,
घरात जरी मनमोकळी नसेल जागा ,
तरी आयुष्यभराचा संस्कार असतो प्रेमाने वागा ,
घरात जरी असेल मातीचा गोबा ,
दुडू दुडु धावणाऱ्या पावलांनी त्यालाही येते शोभा ,
घर फक्त घर नसते ,
ते तर अतूट नात्यांची वीण असते .


आयुष्य सारं काळया आईसाठी ...

राब - राबते मी शेतात ,
आनंदाने न्हाहते कष्टाच्या घामात ,

तन - मन - धन काळया आई त गुंतवते ,
रक्ताच पाणी तिच्याच कुशीत आटवते ,

फुललेल्या शिवाराचे स्वप्न नयनी साठवते ,
धरणी मायेच्या पोटी जन्मलेल्या रोपाला गोंजारते ,
यशोदा होऊन कान्हासारख लाडविते ,

रोपाच्या संवरधनासाठी दीन - रात झटते ,
वट वृक्षात रूपांतर होण्यासाठी काबाड कष्ट करते ,
आयुष्य माझं सारं माय भुमिसाठी अर्पिते ,

दसऱ्याला काळया आईची मनोभावे पूजा करते ,
सोन्यासारखं पिकं फुलू दे मागणं मागते ,
तुझ्यासाठी तुझ्या लेकरांसाठी अती करते ,
आयुष्यभर तुझ्यासाठी ग जगते ,

माझ्या कष्टाचे चीज होऊ दे ग बाई ,
चुकलं असेल काही तर , माफ कर ग आई 

प्रश्न नाही सरणार

हजार प्रश्न मनात रेंगाळती ,
बाजू तुझी ओघळती ,

मिळालेले उत्तर मृगजळ भासती ,
प्रश्न माझ्या अवती भवती फिरती ,

मनास ठाऊक नाही ते ,
का सारखे असे होते ,

तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत रे ,
मनात रेंगाळनारे प्रश्न नाही संपणार रे ,

प्रश्न उत्तराचा खेळ चालूच राहणार ,
उत्तर कधीच नाही देता येणार ,
माझे प्रश्न ही नाही सरणार ...

२१ सप्टें, २०२१

मिलन

तुझ्या नकळत माझ्या नकळत ,
शब्द मुके झाले , मन गुंतले ,
श्वास एकमेकांकडे धावू लागले ,
डोळ्यातून हसू ओघळू लागले ,

तुला पाहताच मी हरवून गेले ,
अडीच शब्द बोलताना जरा अडखळले ,
परत तुझ्या प्रेम मैफिलीत रंगले ,
अश्रुत तुझ्या तुझ्यासवे भिजले ,

मेघ किनाऱ्याचे मज नवे मिळले ,
तुझे माझे मन एक झाले ,
डोळ्यातून प्रेम ऋतु बरसू लागले ,
पापण्यांना मिटने नकोसे वाटले ,

तुझ्या नकळत माझ्या नकळत ,
विणले धागे दोन जीवांचे ,
अरे वेड्या तुझ्या माझ्या प्रेमाचे ,
असं म्हणत हसू ओसंडून वाहू लागले..

तू माझाच हो

मी जेव्हा पहिले तुला ,
माझे आयुष्य मानले तुला ,
तेव्हापासून माझ्या स्वप्नात तुझाच चेहरा दिसतो पुन्हा पुन्हा ,

तू दुःखी असला की मी ही दुःखी असते ,
तू आनंदी असला की मी ही आनंदी असते ,
ह्याची फिलिंग मैत्रिणींनी करून दिली मला ,

तू जेव्हा मला पहिल्यांदा बोललास ,
तेव्हापासून कायम माझच राहिलास ,
तुझ्या मनात काय होते ठाऊक नव्हते मला ,
माझ्या मनात मात्र तू माझा व्हावा हेचं होते ,

तू जेव्हा मला पहिल्यांदा i love you म्हटला ,
तेव्हा आकाश ठेंगणे झाले मला ,
तुझ्यासोबत

सप्तपदी चालण्याचे स्वप्न पाहिले मी नव्याने ,

तुझे माझे काय नाते माहीत नाही मला ,
तरीही आयुष्यभर जपणार आहे तुला ,
तुझ्या आनंदात आणि दुःखात अर्धी वाटेकरी मीच असणार ,

आज सप्तपदी चालण्याचे वचन दे तू मला ,
आयुष्यभर तुझी अर्धांगिनी होण्याचे वचन देते तुला ,
आपण ही प्रेमकहाणी करू कंप्लीट ,
आणि आयुष्यात होऊ परफेक्ट .....


२० सप्टें, २०२१

अस्तित्व

वेदनेची परिभाषा ,
कथा माझ्या जीवनाची ,
तूच समजावली ,
ओळख मजला दिली ,

मी घेत असलेला श्वास तू दिला ,
हृदयात ओसलेली स्वप्न बघण्याची जिद्द दिली ,
ओढ सुखाची तूच दाविली ,
दुःख विसरण्याची कुवत दिली ,

आलेल्या संकटावर मात करण्याची ,
सल्युशन स्किल दिली ,
आनंद मिळेल तिथे जा ,
जगण्याचा न्यू पासवर्ड दिला ,

खूप काही दिलस ,
तुझ्यामुळे नाव मला मिळालं ,
नवीन ओळख मिळाली ,
हे सर्व ज्यांनी दिलं ते तर माझं अस्तित्व आहे ,
माझ्या जगण्याची परिभाषा आहे ....

१९ सप्टें, २०२१

माझी चिमणी

धून ओठीतून आली ,
माझ्या चिमणीची चोचीतून आली ,
चिवचिव करू लागली अवतीभवती ,
आई ही हाक मला अपरुक वाटू लागली ,

माझी चिमणी मला लाडीगोडी लावू लागली ,
मम्मा मम्मा करत काम डिस्टर्ब करू लागली ,
कामाने आलेल्या टेंशन च ती सल्युशन ठरली ,
कामाचा डिग पडलेला असतानाही तिची चिवचिव आवडू लागली ,

काम बाजूला ठेवून तिची चिवचिव ऐकू लागले ,
स्वतः शीच हसू लागले ,
हसता हसता तोंडातून शब्द बाहेर पडले,
माझी चिमणी किती चिव चिव करते ,
पंख नसतांनाही घरभर फिरते ,
असं म्हणत मग तिला कुशीत घेते ,

माझी चिमणी ती किती चिवचिव करते ,
माझ्या प्रोब्लेम वरच सल्युश न  ठरते .....

आठवणींचा पुर

आठवणींचा पूर नयनी दाटून आला ,
अनोळखी तो अल्लड वारा ,
मनास छेडून गेला ,
विरलेल्या आठवणी ताज्या करून गेला 

झुळूक होऊन आला तो अनोळखी पाहुणा ,
ओळखीचा का भासत होता काही कळेना ,
सहवास लाभता त्यांचा डोळ्यातील पाणी काही थांबेना ,

पूर खळखळ वाहू लागला ,
पावण्याचे स्वागतच करायला विसरून गेला ,
मन मोर आठवणींच्या हिंदोळ्यावर डोलू लागला ,

आठवणींचा पूर तो वाहणारच ,
अनोळखी पाहुणा तो ओळखीचा वाटणारच ,
ठाव मनाचा तो घेणारच ,
क्षण हा हळवा करून जाणारच ,
कोवळ्या मनाला यातना ह्या होणारच ,
आठवणींचा पूर तो नयनी दाटून येणारच.......

मनातला मोर मनातच नाचवा

थोडा फार संकोच असावा

,
मनातला मोर मनातच नाचावा ,

तिरस्कार असेल दिसू न द्यावा ,
प्रेम कधी व्यक्त न करावं ,

जीव लावलेला कधी दाखवू नका ,
प्रेमाने घास भरवलेला कधी बोलून दाखवू नका ,

सुख दुःख समान माना ,
परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवा ,
आलेली वेळ निघून जाईल ,
सर्वकाही सुरळीत होईल ,
सतत स्वतःला सांगा ,

मनातला मोर मनातच नाचावा ,
थोडा फार संकोच असावा ,

१८ सप्टें, २०२१

विरह

राणी घायाळ झाली ,
राजाला बोलण्यासाठी व्याकुळ झाली ,
रड रड रडु लागली ,
देवाला विणवू लागली ,
माझ्या राजाला समजावं ,

प्लीज त्याला माझ्याकडे परत पाठव ,


तुझ्या साथीने आम्ही एकमेकांना ,

दिलेले वचन आठव ,

ते  सर्वस्व  होतं माझ ,


पाहिलं प्रेम एक दीर्घ श्वास ,
जीवन जगण्याचा ध्यास ,
अजुनही त्याला भेटण्याची आस ,
कारण तो आहेच खूप खास ,
एक होऊ दे देवा त्याच्या माझ्या ,
नशीबाची रेषा .....

असं म्हणत राणी आतून ,
जळू लागली ,
आसवांना पिऊ लागली ,
राजा येईल ह्या आशेवर रात रात जागू लागली ,

राजा धरतीचा गं !!!

    

        कष्टाच्या घामाला त्यानेच अर्थ दिला खरा ,

    अन्यायाच्या अंधारातून स्वराज्य स्थापन केला बरा ,

            वाईट शत्रूचा त्याने नायनाट केला ,

            सर्व बंधनाला त्याने तडीस नेले गं !

               शिव छत्रपती शिव छत्रपती ,

                     राजा धरतीचा गं !!!
                                                 

             शिव छत्रपती शिव छत्रपती ,
                  राजा धरतीचा गं !!!   
                                                दुर्गा मते...✍️

आता नाही बोलायचं

झालं गेलं आता काय बोलायचं ,
सांगून ही तुला आता नाही कळायचं ,

अखडू आहेस रे तू छळ छळणारच ,
अबोला हा माझ्याशी धरणारच ,

एक दिवस अचानक मेसेज करशील ,
आणि बोलशील सवय आहे माझी ती कॉमेडी करण ,
आता सुरू करूया बोलणं ,
बास अबोल्याची नाटकं ,

तुला आता चांगलीच ओळखायला लागली ,
तुझी असते नेहमीच मनमर्जी ,
तुला सांगुन ही नाही कळायचं ,
म्हणून ठरवल तुझ्याशी नाही बोलायचं ...

१७ सप्टें, २०२१

ओंजळ

ओंजळ सुखाची भरू दे ,
प्रीत तुझी माझी जुळू दे ,
बहरू दे वेल प्रेमाची ,
अडी नको रे राजा गैर समाजाची ,

आस

आस तुला भेटण्याची ,
डोळे भरून बघण्याची ,
मनी आशा तुझी राणी होण्याची ,
हातावर मेहंदी तुझ्या नावाची ,
फुलाने फुलाने सजावी ,
बाग सुखी संसाराची 

मैत्री

 . मैत्री कोणत्याही नात्यात असो ती मैत्री असते . कोणाच्यातरी येण्याने आपली मैत्री तुटेल एवढी कमकुवत मैत्री नक्कीच नसावी .

-नित्या मते

१४ सप्टें, २०२१

ह्दयात आनंद झाला.

 ह्दयात आज आनंद झाला

माझा प्राण सखा आज दिसला

विरह हा माझा सरुन गेला

प्रेम द्याला माझा सखा समोर आला.
🌹🌹🌹🌹🌹♥️🌹🌹🌹🌹🌹

१३ सप्टें, २०२१

आनंद

               आनंद

          

          जिवनाचा आनंद मी गवसला

          माझ्या शब्द ओवीत तो मी मांडला

          अधीर झालेले मन हे स्थीर झाले.

           शब्दात मी माझा आनंद गवसला

                                                दुर्गा मते...✍️

स्वप्न

 स्वप्न माझे तुझे  एक व्हावे