धून ओठीतून आली ,
माझ्या चिमणीची चोचीतून आली ,
चिवचिव करू लागली अवतीभवती ,
आई ही हाक मला अपरुक वाटू लागली ,
माझी चिमणी मला लाडीगोडी लावू लागली ,
मम्मा मम्मा करत काम डिस्टर्ब करू लागली ,
कामाने आलेल्या टेंशन च ती सल्युशन ठरली ,
कामाचा डिग पडलेला असतानाही तिची चिवचिव आवडू लागली ,
काम बाजूला ठेवून तिची चिवचिव ऐकू लागले ,
स्वतः शीच हसू लागले ,
माझी चिमणी किती चिव चिव करते ,
पंख नसतांनाही घरभर फिरते ,
असं म्हणत मग तिला कुशीत घेते ,
माझी चिमणी ती किती चिवचिव करते ,
माझ्या प्रोब्लेम वरच सल्युश न ठरते .....
खूप सुदंर रचना आणि तुमची सोनुली 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना....तुझ्या लाडक्या चिमणीला अनेक आशीर्वाद...😘👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवा